Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nagpur Crime: नोकरी अन् लग्नाचं आमिष दाखवून महिलेची फसवणूक; कीटकनाशक प्राशन करून महिला कबड्डीपटूने उचललं टोकाचं पाऊल

Nagpur Crime: नोकरी अन् लग्नाचं आमिष दाखवून महिलेची फसवणूक; कीटकनाशक प्राशन करून महिला कबड्डीपटूने उचललं टोकाचं पाऊल

Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना उघड झाली आहे. स्थानिक महिला कबड्डीपटूने सततच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे माळेगाव टाऊन परिसरात मोठी खळबळ माजली आहे. किरण सूरज दाढे असे मृत महिला कबड्डीपटूचे नाव असून ती गेल्या काही वर्षांपासून खेळात सक्रिय होती.

नोकरीचं आमिष

प्राप्त माहितीनुसार, किरणचे २०२० मध्ये स्वप्निल जयदेव लांबघरे या व्यक्तीसोबत नोंदणी विवाह झाला होता. लग्नापूर्वी स्वप्निलने तिला वेकोलीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल या विश्वासाने किरणने विवाहस्वरूप नाते स्वीकारले होते. मात्र, लग्नानंतर परिस्थिती पूर्णपणे उलट झाली. स्वप्निलने किरणला स्वतःकडे न ठेवता तिला माहेरीच राहण्यास भाग पाडले. दरम्यान, नोकरीच्या आश्वासनाबाबत सतत टाळाटाळ, वारंवार मानसिक त्रास, तसेच शरीरसंबंधांसाठी कथित दबाव अशा अनेक प्रकारच्या छळाला किरणला सामोरे जावे लागत असल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत. त्याचदरम्यान स्वप्निलने घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचेही उघड झाले.

हेही वाचा –सोलापूर हादरले..! सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चार जणांवर गुन्हा दाखल

4 डिसेंबरला घेतला टोकाचा निर्णय

या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या किरणने ४ डिसेंबरच्या सकाळी कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर तिला तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, 7 डिसेंबरला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आरोपी पती फरार

किरणच्या मृत्यूमागील छळाच्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपी स्वप्निल लांबघरेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र, प्रकरण उघड होताच तो फरार झाल्याचे समोर आले असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. एका होतकरू महिला खेळाडूच्या आयुष्याशी अशा प्रकारे खेळ केल्याच्या आरोपांनी सावनेर परिसरात संतापाची लाट पसरली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!