पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सातारा सहकारी बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सातारा सहकारी बँक येथे उपमहाव्यवस्थापक आणि सहाय्यक महाव्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत २ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उपमहाव्यवस्थापक आणि सहाय्यक महाव्यवस्थापक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सातारा
– वयोमर्यादा : ५५ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 09 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सातारा सहकारी बँक लि., भारतीय क्रीडा मंदिर, 3रा मजला, नायगाव-वडाळा रोड, वडाळा.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : info@satarabank.net
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.satarabank.net/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


