Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत; ‘व्ही. शांताराम’ यांच्या पत्नीची साकारणार भूमिका

तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत; ‘व्ही. शांताराम’ यांच्या पत्नीची साकारणार भूमिका

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण असं की, रिलीज झालेलं पोस्टर. नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमध्ये दिसून येत आहे. या झलकेतून चित्रपटाची भव्य रचना, अचूक मांडणी आणि त्या काळाचा कॅन्व्हास या पोस्टरमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.

चित्रपटात ‘जयश्री’ हे पात्र केवळ व्ही. शांताराम यांच्या पत्नीचे नसून, ते त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे. सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘व्ही. शांताराम’ यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण केली होती.

आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’ यांच्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचे समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील जवळीक पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे. या पोस्टरची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!