लग्नासाठी मुलगी पाहणे सध्या चांगलेच कठीण होत आहे. मुलगी जरी चांगली मिळाली तरी मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना मुलीकडून अनेक अपेक्षा असतात. मुलगी कशी मिळेल यापासून ते अनेक गोष्टींचा विचार केला जातो. पण, काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच पुढील गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या पारखणे सोयीचे ठरते.
मुलगी सुसंस्कृत, विनम्र आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारी असावी हे पाहावे. इतकेच नाहीतर मुलीचे शिक्षण आणि जीवनातील निर्णय घेण्याची क्षमता पाहावी. स्वतंत्र विचारसरणी असणाऱ्या मुलीला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. आर्थिक ज्ञान असणारी मुलगी घराच्या आर्थिक व्यवस्थापनात मदत करू शकते. सामाजिक ज्ञान असणारी मुलगी समाजात मिळून मिसळून राहू शकते. धैर्य आणि साहस असणारी मुलगी जीवनातील उतार-चढावात साथ देऊ शकते. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
तसेच पतीसह पतीच्या परिवाराची काळजी घेणारी मुलगी घराचे वातावरण सुखद करू शकते. मुलीमध्ये सहानुभूती आणि दया असावी. मुलगी घरकण्या अर्थात घराची काळजी घेणारी मुलगी घराचे वातावरण सुखद करू शकते. स्वच्छता आणि सुव्यवस्था असणारी मुलगी घराचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर करू शकते. यांसह इतर काही बाबी पाहिल्यास नक्कीच पुढील गोष्टी चांगल्या होऊ शकतात.


