Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अपघातानंतर महिमा चौधरीचा चेहरा झाला होता विद्रूप; अनेक चित्रपटांची ऑफरही गेली पण नंतर…

अपघातानंतर महिमा चौधरीचा चेहरा झाला होता विद्रूप; अनेक चित्रपटांची ऑफरही गेली पण नंतर…

मुंबई : ९० च्या दशकात लोकप्रिय झालेली अभिनेत्री महिमा चौधरी सध्या चर्चेत आहे. ती संजय मिश्रा यांच्यासोबत ‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर महिमा चौधरी हिंदी चित्रपटसृष्टीत परतली आहे. तिने तिच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे, त्यानंतर ती आता मोठ्या पडद्यावर परतली आहे.

महिमा चौधरी ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तिचे ‘परदेस’, ‘दिल क्या करे’, आणि ‘धडकन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मात्र, नंतर एका अपघातामुळे ती अचानक प्रसिद्धीझोतातून गायब झाली. १९९९ च्या ‘दिल क्या करे’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महिमा एका कार अपघातात जखमी झाली आणि तिला गंभीर दुखापत झाली. तिच्या शरीरात काचेचे ६७ तुकडे अडकले होते. मात्र, ते शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले.

याशिवाय, महिमा चौधरीचे आयुष्य सोपे नसल्याचे दिसून आले. तिचा पहिल्या पतीशी घटस्फोट झाला. मात्र, तिचे संकट एवढ्यावरच न थांबता महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग झाला, ज्यातून ती अलीकडेच बरी झाली. महिमाने तिच्या आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, माझ्या पहिल्या चित्रपटानंतर मला न्यायालयात खेचण्यात आले. मला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले. पण नंतर एक वर्षे घरातच राहिले, असे महिमा चौधरी हिने म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!