Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Eknath Shinde: ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे अडचणीत, भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडलं? अंधारेंचा खळबळजनक आरोप

Eknath Shinde: ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे अडचणीत, भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडलं? अंधारेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : शिवसेना (उबाठा)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाच्या नावाने सातारा जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने १३ डिसेंबर रोजी छापा टाकून मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती करणारी युनिट उद्ध्वस्त केली होती.

यात सुमारे ११५ कोटी रुपये किमतीचे ड्रग्स व कच्चा माल जप्त करण्यात आल्याचा दावा अंधारेंनी लंकेला आहे. तसेच याची किंमत १४५ कोटी असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांचे आरोप काय?

सुषमा अंधारे यांनी दावा केला की, छाप्यात ४५ किलो ड्रग्स सापडले असून ते प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्टजवळील पत्र्याच्या शेडमध्ये साठवले होते. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून, त्यांनी २०१७ मध्ये ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. रिसॉर्टचे नाव ‘हॉटेल तेजयश’ असून, ते प्रकाश शिंदे यांच्या मुलांच्या नावाने आहे. तेथे सात-आठ रूम बांधल्या असून, स्विमिंग टँकसह इतर सुविधा आहेत.

अंधारे यांनी सांगितले की, शेडचा मालक गोविंद सिंदकर आहे. त्याने ओंकार दिघे याला शेडची चावी दिली होती. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तेथे राहणाऱ्या तीन व्यक्तींना जेवण प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून येत होते. या तीन जणांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत? एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही? सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती लपवली असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, एखाद्या प्रकरणात पोराचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जातो, तर ड्रग्स प्रकरणात भावाचे नाव आले तर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. हे प्रकरण उघडकीस आणल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षा मागितली.

काय आहे प्रकरण?

मुंबई क्राइम ब्रांचने १३ डिसेंबर रोजी सावरी गावातील एका शेडमध्ये छापा टाकला. यात ७.५ किलो घन एमडी, ३८ किलो द्रव एमडी आणि कच्चा माल जप्त करून एकूण ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तीन कामगारांना अटक करण्यात आली. हे प्रकरण पुण्यातील विशाल मोरे याच्या अटकेपासून उघडकीस आले.

कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही आरोप केले की, जेवण प्रकाश शिंदे यांच्या ‘तेजस हॉटेल’मधून येत होते. ओंकार दिघे याने प्रकाश शिंदे यांच्या कामासाठी जागा मागितली होती. मात्र प्रकाश शिंदे यांचे रिसॉर्ट किंवा थेट मालकी असल्याचे अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत. हे प्रकरण राजकीय वादाचे रूप घेत असून, महायुती सरकारवर माहिती दडपण्याचा आरोप होत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!