Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नागपूरच्या MIDC मध्ये मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी कोसळून३ कामगारांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली अडकल्याची भीती

नागपूरच्या MIDC मध्ये मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी कोसळून३ कामगारांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली अडकल्याची भीती

नागपूर : उपराजधानी नागपूरजवळील बुटिबोरी MIDC परिसरात अवाडा (Avaada) कंपनीत आज सकाळी ११ वाजता मोठी दुर्घटना घडली. सोलर पॅनल उत्पादन करणाऱ्या या कंपनीत निर्माणाधीन असलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ कामगारांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, टाकीचे काम अंतिम टप्प्यात होते. काम करत असलेले अनेक कामगार टाकी कोसळताना त्याखाली दबले गेले. मलब्याखाली आणखी काही कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र वॉटर प्रेशरमुळे टाकी कोसळल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्यासह पोलीस पथक आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या या परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती समोर येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!