Epstein Files: अमेरिकेसह जगभरात खळबळ माजवणाऱ्या एपस्टीन फाईल्समधून 68 नवे फोटो समोर आले आहेत. जेफ्री एप्सटीन केसमध्ये अमेरिकी हाउस ओवरसाइट कमिटीच्या डेमोक्रॅट्सनी 68 नवे फोटो रिलीज केले आहेत. यात आक्षेपार्ह टेक्स्ट, पासपोर्ट आणि खाजगी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित होता. आता हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आहे.
अमेरिकी संसदेच्या हाउस ओवरसाइट कमिटीमध्ये डेमोक्रॅट खासदारांनी एप्सटीनच्या मालमत्तेशी संबंधित 68 नवे फोटो शेअर केले आहेत. अमेरिक न्याय विभागाने केसच्या तपासाशी संबंधित अनक्लासिफाइड फाइल्स 19 डिसेंबरपर्यंत जारी करण्याचा आदेश दिला होता. डेमोक्रॅट खासदारांकडून जारी केलेल्या या फोटोंमध्ये अतिशय अस्वस्थ करणारा मजकूर समोर आला आहे. तसेच आता नव्या फोटोंमध्ये अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प, बिल गेट्स अन् इतर सेलिब्रिटी यांचे देखील फोटो समोर आले आहेत.
मुलींच्या शरीरावर ‘लोलिता’ कादंबरीतील ओळी
काही फोटोंमध्ये महिलेच्या शरीरावर काळ्या शाईने ‘लोलिता’ या कादंबरीतील वाक्ये लिहिलेली दिसतात. हे पुस्तक एका १२ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात असलेल्या एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. फोटोंमध्ये महिलेच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर या ओळी लिहिलेल्या दिसतात. याशिवाय अनेक महिलांच्या ओळखपत्रांचेही फोटो समोर आले आहेत. ज्यात नावे लपवलेली आहेत पण देशांचा उल्लेख आहे. ही ओळखपत्रे रशिया, मोरक्को, इटली, चेक रिपब्लिक, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि लिथुआनियाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहेत.
मुलींची बोली लागली?
काही फोटोंमध्ये रात्री उशिराच्या टेक्स्ट चॅटचेही स्क्रीनशॉट आहेत, ज्यात एखाद्या व्यक्तीला एक हजार डॉलरमध्ये मुली पाठवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे दिसत आहे. फोटोंच्या संपूर्ण संग्रहात 95,00 फोटो आहेत. यातील 68 पुन्हा एकदा जारी करण्यात आले आहेत. हा पूर्ण संग्रह एप्सटीनच्या मालमत्तेतून हाउस ओवरसाइट कमिटीला देण्यात आला होता. एका स्क्रीनशॉटमध्ये टेक्स्ट मेसेज दिसतो, ज्यात लिहिले आहे की मी आता मुली पाठवतो आहे. या मेसेजसोबत एखाद्या किशोरीशी संबंधित माहितीही दिसते, मात्र हे स्पष्ट नाही की मेसेज कोणी पाठवला आणि कोणाला पाठवला. यात एका रशियन मुलीची किंमत 1000 डॉलर सांगितली गेली आहे.
डोनाल्ट ट्रम्प यांचे देखील फोटो आहेत?
मागच्या आठवड्यातही १९ फोटो जारी करण्यात आले होते. यामध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे देखील काही फोटो आहेत. ट्रम्प यांनी त्यावेळी सांगितले होते की एप्सटीनसोबत सर्वांचे फोटो आहेत, ही काही मोठी गोष्ट नाही. नव्या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, प्रोफेसर आणि राजकीय कार्यकर्ते नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव बॅननही दिसत आहेत. मात्र या सर्वांच्या प्रतिनिधींकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. डेमोक्रॅट खासदारांनी स्पष्ट केले आहे की या फोटोंमध्ये कोणाचे दिसणे हे कोणत्या गुन्ह्याचे पुरावे नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की फोटो फक्त पारदर्शकतेच्या उद्देशाने जारी करण्यात आले आहेत.
कोण होता जेफ्री एपस्टीन?
20 जानेवारी 1953 रोजी न्यूयॉर्कमध्ये एपस्टीनचा जन्म झाला होता. त्याच्या जीवनातील सुरुवातीचा काळ न्यूयॉर्कमध्येच गेला, जिथं त्यानं डॉल्टन स्कूलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय शिकवले. एपस्टीननं पदवी शिक्षण मात्र पूर्ण केलं नव्हतं. शालेय जीवनातच मित्राच्या वडिलांवर एपस्टीनचा इतका प्रभाव पडला की, त्याला वॉल स्ट्रीटवर असणाऱ्या Investment Bank ‘बिअर स्टियर्न्स’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवलं.
हा तोच टप्पा होता, जिथून एपस्टीननं कधी मागे वळून पाहिलं नाही. चार वर्षांनंतर तो इन्वेस्टमेंट बँकर म्हणून नावारुपास आला. 1982 मध्ये या कंपनीपासून वेगळं होत त्यानं ‘जे. एपस्टीन एंड कंपनी’ची सुरुवात केली. या कंपनीच्या माध्यमातून तो अशा व्यक्तींची संपत्ती सांभाळत होता, ज्यांचं मूल्य अब्जावधींमध्ये होतं. पाहता पाहता एपस्टीन यांनी आपल्या संपर्काच्या कक्षा रुंदावल्या आणि वॉल स्ट्रीटवरील नावाजलेल्या लोकांमध्ये त्याची गणना होऊ लागली. ज्याचा परिणाम एपस्टीनला झालेल्या तोबा आर्थिक नफ्यामध्ये दिसून आला.
पैसा वाढतच गेला आणि एपस्टीननं फ्लोरिडामध्ये प्रासाद, न्यू मेक्सिकोमध्ये रेंच आणि न्यूयॉर्कमध्ये एक खासगी घरसुद्धा खरेदी केली. तेव्हाचे आघाडीचे धनाढ्य व्यक्ती, नवउद्योजक आणि सेलिब्रिटी पार्ट्यांना तो हजेरी लावत होता. एपस्टीनचं नाव सातत्यानं प्रसिद्धीझोतात येत हेलं. पुढं अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, मानवी तस्करी (महिला अन् लहान मुली) असं एक नेटवर्क एपस्टीन चालवू लागला. त्याची मदमस्त सत्ता, सरकारलाही धूळ चारत सुरू असणारी त्याची कामं जणू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली, त्यातच लक्ष वेधत होतं ते त्याचं सिक्रेट आयलंड. एपस्टीनची सुरुवात शुन्यातून झाली आणि त्याचा शेवटही शून्यातच झाला.


