महाराष्ट्र जागरण डेस्क: जेवणामध्ये तंतू (फायवर) युक्त आहार वाढवणे, हा हार्टअॅटॅक टाळण्याचा सोपा मार्ग आहे. हा आहार काय करतो? आतड्यामध्ये एक प्रकारचा जेलीसारखा स्तर निर्माण करतो, जो मंदगतीने आतड्यात पुढे पुढे सरकतो. त्यामुळे जेवलेल्या पदार्थांमधील चरबीचे शरीरात शोषण होत नाही. त्यामुळे हृदयासाठी घातक असे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. एवढेच नाही तर बाईल अॅसिड (यकृतामधील पित्त) बरोबर संयुक्त होऊन त्याला शरीराबाहेर फेकण्यास चोथा मदत करतो.
नवीन बाईल अॅसिड तयार करण्यासाठी यकृत रक्तामधील “कोलेस्ट्रॉल वापरते. तेव्हा हार्ट अॅटॅक टाळण्यासाठी कडधान्ये, शेंगाभाज्या (मटार, फरसबी) पालेभाज्या, कोशिंबीर, कोंड्यासहित गहू-तांदूळ, अंजीर बदाम-खजूर- अक्रोड, भरपूर फळे खा !


