Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरीराला आवश्यक असणारे हे पदार्थ तुम्ही खाताय ना?

शरीराला आवश्यक असणारे हे पदार्थ तुम्ही खाताय ना?

महाराष्ट्र जागरण: शरीर सुदृढ राहण्यासाठी त्याला अनेक अन्नघटकांची आवश्यकता असते. हे अन्नघटक पुरेशा प्रमाणात शरीरात गेल्यास शरीराचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते, अन्यथा ठरावीक काळाने आपल्याला विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. रोजच्या आहारात सहज समावेश करू शकू असे हे घटक आवर्जून खायला हवेत. अनेकदा धावपळीत आपले आहाराकडे दुर्लक्ष होते. आवडी-निवडी असल्याने ठरावीकच गोष्टी खाणे, डब्यातले अन्न टाकून देणे, जिभेला चविष्ट लागत असल्याने बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे शरीराला कोणते घटक आवश्यक असतात, त्यांचे शरीराच्या कार्यात असणारे महत्त्व आणि ते खाल्ले नाहीत तर कोणत्या तक्रारी उद्भवतात याविषयी…

कॅल्शियम:

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, ज्वारी, राजगिरा यामध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे यातील पदार्थ आवर्जून आहारात घ्यावेत. याबरोबरच खरबूज, खजूर आणि मुळा, कोबी या भाज्यांमध्येही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते. कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असते. हे घटक आहारात घेत नसाल तर त्यामुळे हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. सुरुवातीला गंभीर न वाटणाऱ्या या समस्या कालांतराने गंभीर होऊ शकतात.

लोह:

महिलांमध्ये साधारणतः लोहाची कमतरता असल्याने त्यांना विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. मात्र असे होऊ नये यासाठी लहानपणापासूनच खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, ऊस, बोरे, मध, पपई आणि मेथी यांचा आहारात समावेश करावा. शरीराची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी हा घटक अत्यावश्यक असतो. लोहाची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

आयोडिन:

हा शरीरातील एक आवश्यक घटक आहे. केवळ मीठातच आयोडिन असते, असा आपला समज असतो. मात्र शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण या पदार्थांमध्ये आयोडिन असते. शरीरात उत्पन्न होणाऱ्या पदार्थापासून मेंदूचा बचाव करण्याचे काम आयोडिनद्वारे केले जाते. याची कमतरता असलेल्यांना थायरॉइडची समस्या, केस गळणे, नैराश्य असे त्रास उद्भवू शकतात.

मॅग्नेशियम:

बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लिची, कारलं या पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते. मात्र त्याची कमतरता असेल तर उदास होणे, आळस येणे, ताण येणे, झोप न लागणे, बेचैनी, सोरायसिस, फोड येणे, नपुंसकता किंवा वांझपणा अशा तक्रारी उद्भवतात. मॅग्नेशियममुळे पेशीचं कार्य सुधारतं आणि ते शरीरातील रेचक म्हणून काम करते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!