Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Prakash Mahajan Join Shiv Sena: प्रकाश महाजनांचा मनसेला रामराम; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवर जोरदार घणाघात

Prakash Mahajan Join Shiv Sena: प्रकाश महाजनांचा मनसेला रामराम; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवर जोरदार घणाघात

Prakash Mahajan Join Shiv Sena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी अखेर राज ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर कडाडून टीका केली असून, शिंदेंच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

‘दोघे भाऊ एकत्र आले तरी अंधार चुकणार नाही’

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना प्रकाश महाजन म्हणाले की, अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जाऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, पण त्यांच्या नशिबी असलेला अंधार आता कोणालाही टाळता येणार नाही. २० वर्षांचा दुरावा अवघ्या १० मिनिटांत कसा काय संपू शकतो? दोघांनीही हिंदुत्व सोडले आहे. एकदा का जागावाटप जाहीर झाले की, त्यांच्यासोबत कोणीही उरणार नाही.

हेही वाचा – Prashant Jagtap : 9 मिनिटांचा फोन कॉलही ठरला अपयशी; उद्धव ठाकरेंचा मान राखला, पण प्रशांत जगताप यांनी अखेर ‘या’ पक्षाचीचं वाट धरली!

राज ठाकरेंना ‘औषधा’चा टोला

एकनाश शिंदेंच्या उपलब्धतेचे कौतुक करताना त्यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता चिमटा काढला. महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे हे रात्री कितीही वाजता कार्यकर्त्यांना भेटणारे नेते आहेत. गुरुवारी रात्री १२ वाजता मी त्यांना भेटलो, तेव्हाही ते तितक्याच उत्साहात होते. बाकीचे काही लोक तर ‘औषध’ घेऊन लवकर झोपतात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागची कारणे स्पष्ट करताना महाजन म्हणाले की, मला हिंदुत्वासाठी काम करायचे होते आणि शिंदे साहेब खऱ्या अर्थाने हिंदुत्वाविषयी जागरूक आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असूनही ते स्वतःला ‘नेता’ न समजता कार्यकर्त्याचा माणूस समजतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. जातीयवादाने महाराष्ट्र पेटलेला असताना शिंदेंनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!