Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Prashant Jagtap : 9 मिनिटांचा फोन कॉलही ठरला अपयशी; उद्धव ठाकरेंचा मान राखला, पण प्रशांत जगताप यांनी अखेर ‘या’ पक्षाचीचं वाट धरली!

Prashant Jagtap : 9 मिनिटांचा फोन कॉलही ठरला अपयशी; उद्धव ठाकरेंचा मान राखला, पण प्रशांत जगताप यांनी अखेर ‘या’ पक्षाचीचं वाट धरली!

Prashant Jagtap : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहराच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर ‘घड्याळा’ची साथ सोडून अधिकृतपणे काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत (शरद पवार आणि अजित पवार) पडद्यामागे सुरू असलेल्या तडजोडीच्या चर्चांमुळे जगताप प्रचंड नाराज होते. भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या कोणाशीही आपण युती करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी काल आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे पुण्यात खळबळ उडाली असतानाच, अवघ्या काही तासांत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला.

हेही वाचा – पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेस-उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार?

उद्धव ठाकरेंचा ‘९ मिनिटांचा’ तो फोन कॉल…

प्रशांत जगताप यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे आणि जगताप यांच्यात सुमारे 9 मिनिटे फोनवर चर्चा झाली. आमचा पक्ष भाजपसोबत कधीही जाणार नाही, तुम्ही आमच्याकडे या, तुमचा योग्य सन्मान केला जाईल, असे आमंत्रण ठाकरेंनी जगताप यांना दिले होते. उद्धव ठाकरेंनी एका कार्यकर्त्याला फोन केल्याबद्दल जगतापांनी त्यांचे आभार मानले, मात्र आपली विचारधारा काँग्रेसशी अधिक जुळत असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेची ऑफर नम्रपणे नाकारली.

काँग्रेसच का? जगतापांनी मांडली भूमिका

पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझी लढाई कोणा व्यक्तीविरोधात नसून संविधान आणि पुरोगामी विचारधारेसाठी आहे. महायुतीला आणि भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. मी मूळचा काँग्रेस विचारधारेचा कार्यकर्ता असल्याने घरी परतल्याची भावना आहे, असं जगताप यांनी नमूद केलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!