Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोंढव्यात बेकायदा दारूविक्रीचा भंडाफोड; घरझडतीत सापडले कोट्यवधींचे नोटांचे बंडल

कोंढव्यात बेकायदा दारूविक्रीचा भंडाफोड; घरझडतीत सापडले कोट्यवधींचे नोटांचे बंडल

Illegal liquor sale Pune कोंढवा परिसरात बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिच्या घराची झडती घेताना कोंढवा पोलिसांना घरातील एका कपाटात नोटांचे मोठ्या प्रमाणात बंडल सापडले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी नोटांची मोजदाद केली असता, सुमारे एक कोटी रुपयांचा आकडा समोर आला.

अमर कौर ऊर्फ मद्रीसिंग दादासिंग जुनी (वय 55), दिलदारसिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 1 कोटी 85 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक परिसरात व्हीआयआयटी कॉलेजकडून अप्पर इंदिरानगरकडे जाण्याच्या रस्त्यावर काकडेवस्ती आहे. हा संपूर्ण वस्ती भाग आहे. येथील गल्ली क्रमांक दोनमध्ये अमर कौर राहते. या वस्तीत ती बेकायदा गावठी दारूची विक्री करते. पोलिसांनी यापूर्वीही तिच्यावर कारवाई केलेली होती. काकडेवस्ती येथे अमर कौरच्या घरी पुन्हा बेकायदा दारूविक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सायंकाळच्या सुमारास तपास पथकाने काकडेवस्तीत संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकला.

या छाप्यात सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याकडे काही प्रमाणात रोकड आढळून आली. त्यामुळे पुढील तपासासाठी घराची सखोल झडती घेतली असता, बेडरूममधील कपाटात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली. या कारवाईमुळे कोंढवा परिसरात बेकायदा दारूविक्रीबरोबरच काळ्या पैशांच्या व्यवहारावरही प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत असून, आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोटा मोजण्यासाठी पोलिसांनी तत्काळ नोटा मोजण्याचे मशिन मागवले. रात्री उशिरापर्यंत नोटांची मोजणी पूर्ण झाली. एक कोटींहून अधिक रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड तिच्या घरात कशी आणि कोणत्या मार्गाने आली, याबाबत ती समाधानकारक माहिती देऊ शकली नाही. त्यामुळे रोकडच्या स्रोताबाबत संशय अधिक बळावला. रोकड मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने कोंढवा पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला पाचारण केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!