Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठा अपघात! रोहित शर्माचा सहकारी रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठा अपघात! रोहित शर्माचा सहकारी रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?

Angkrish Raghuvanshi Injury : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईचा फलंदाज अंगकृष रघुवंशी एका भीषण अपघाताचा बळी ठरला. सीमारेषेवर झेल पकडण्यासाठी ‘डायव्ह’ मारताना अंगकृषच्या मानेला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याला मान हलवणेही कठीण झाले होते, अखेर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेऊन तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.

नेमकी घटना कशी घडली?

उत्तराखंडच्या डावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना अंगकृषने एक कठीण झेल पकडण्यासाठी हवेत झेप घेतली. मात्र, जमिनीवर आदळताना त्याच्या शरीराचा समतोल बिघडला आणि थेट मानेवर भार पडला. या धक्क्यामुळे त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो जागेवरून हलूही शकला नाही. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा – Rashtriya Bal Puraskar 2025 : क्रिकेट विश्वात बिहारच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मान

रोहित शर्मा शून्यावर बाद

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबईकडून सलामीला आला होता, मात्र तो पहिल्याच चेंडूवर बाद (Golden Duck) झाला. त्याचा जोडीदार अंगकृष रघुवंशीने 11 धावा केल्या. हार्दिक तामोरेच्या स्फोटक नाबाद 93 धावा आणि शम्स मुलानीच्या 48 धावांच्या जोरावर मुंबईने 300 धावांचा टप्पा ओलांडला.

सामन्याचा निकाल

उत्तराखंडकडून सलामीवीर युवराज चौधरीने 96 धावांची झुंजार खेळी केली, तर जगदीश सुचितनेही 51 धावांचे योगदान दिले. मात्र, मुंबईच्या आव्हानासमोर त्यांची ही झुंज अपुरी ठरली. तथापी, प्राथमिक माहितीनुसार, अंगकृषची दुखापत सुरुवातीला वाटते तितकी गंभीर नसावी असा अंदाज आहे. मात्र, त्याच्या मानेचे स्कॅनिंग आणि वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच तो पुन्हा कधी मैदानात उतरणार, हे स्पष्ट होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!