Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Metro Night Service: पुणेकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! आज रात्रभर धावणार मेट्रो; ‘असे’ असेल नाईट मेट्रोचे वेळापत्रक

Pune Metro Night Service: पुणेकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! आज रात्रभर धावणार मेट्रो; ‘असे’ असेल नाईट मेट्रोचे वेळापत्रक

Pune Metro Night Service: सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झालेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाची सोय व्हावी, यासाठी पुणे मेट्रोने रात्रभर आपली सेवा सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची संभाव्य गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन महामेट्रोने हे पाऊल उचलले आहे.

नाईट मेट्रोचे वेळापत्रक कसे असेल?

आज रात्री नियमित वेळ संपल्यानंतरही मेट्रो थांबणार नाही. रात्री 11 वाजेपासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सतत धावत राहील. साधारणपणे दर 20 मिनिटांच्या अंतराने प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असेल. मात्र, जर एखाद्या स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली, तर फेऱ्यांची संख्या आणखी वाढवण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे. उद्या सकाळी 6 नंतर मेट्रो पुन्हा आपल्या दैनंदिन वेळापत्रकानुसार सुरू होईल.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad : थंडी वाढली! पिंपरी-चिंचवडमधील मनपा शाळांच्या वेळेत बदल; कसं असेल नवीन वेळापत्रक?

सुरक्षितता आणि सोयीला प्राधान्य

नवीन वर्षाच्या निमित्ताने शहरातील रस्ते वाहतूक कोंडीने गजबजलेले असतात. तसेच ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चे प्रकार टाळून नागरिकांना सुरक्षितपणे घरी पोहोचता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही आता ‘नाईट मेट्रो’चा अनुभव घेता येणार आहे. या विशेष सेवेसाठी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक आणि कडक सीसीटीव्ही पाळत ठेवण्यात आली असून पुणे पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा – Pune Traffic Update : 31 डिसेंबरला घराबाहेर पडताय? पुण्यातील ‘या’ मार्गांवर असेल वाहतूक कोंडी; पाहा पर्यायी मार्ग

नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता

सप्टेंबर 2025 मध्ये पुणे मेट्रोने 2.53 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडून नवा रेकॉर्ड केला होता. आज रात्रीच्या या विशेष सेवेमुळे प्रवासी संख्येचा हा आकडा नवा उच्चांक गाठण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!