नागपूर : विवाहित असताना परपुरुषाशी संबंध ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. पती कामाला गेल्यानंतर विवाहिता आणि तिचा प्रियकर यांची नेहमीप्रमाणे भेट झाली; पण विवाहितेने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून हत्या केली. एवढ्यावर तो थांबला नाही, तर त्याने विवाहितेच्या मृतदेहावर बलात्कार केला. दरम्यान, महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले.
पोलिसांनी रोहित गणेश टेकाम या संशयित आरोपीला अटक केली. या प्रकारानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. रोहित आणि संजना यांचे अनैतिक संबंध होते. शनिवारी रोहित हुडकेश्वर खुर्दमध्ये राहत असलेल्या संजनाच्या घरी आला. तिच्याकडे त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, संजनाने त्याला नकार दिला. चिडलेल्या रोहितने दारूच्या नशेत मारहाण केली. तरीही तिने संबंधासाठी नकार दिला. शेवटी रोहितने तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहावर बलात्कार करून पळ काढला.


