Today शनिवार, 15th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indapur College: इंदापूर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने पथनाट्याद्वारे संविधानाचा जागर

Indapur College: इंदापूर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने पथनाट्याद्वारे संविधानाचा जागर

Indapur College: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर रत्नप्रभादेवी महाविद्यालय, बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी शिबिरामध्ये कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर राज्यशास्त्र विभागाद्वारे “जागर संविधानाचा” हे पथनाट्य रेडा या गावात आणि शिबिराच्या ठिकाणी सादर करण्यात आले.

संविधानातील हक्कांची प्रभावी मांडणी

या पथनाट्याच्या माध्यमातून राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी गावातील लोकांमध्ये जनजागृती केली. वेग-वेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून संविधानामध्ये अंतर्भूत असलेले मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकांचे हक्क, स्त्रियांचे हक्क याविषयी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली. संविधान मूल्य आपल्या सर्वांच्या जगण्याचा भाग झाले पाहिजेत. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन व संविधानिक मूल्य अंगीकारले पाहिजे यासाठी अशा पथनाट्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा – राज्यस्तरीय उत्कर्ष स्पर्धेत इंदापूर महाविद्यालयाचा आवाज घुमला; सरदार मुलाणीचा लोककलेत द्वितीय क्रमांक

वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर

भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय व्यक्तीला समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक हक्क, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क व शोषणाविरुद्धचा हक्क देते या हक्काविषयी गावागावांमध्ये अशा पथनाट्याच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्याचा अभिनव उपक्रम राज्यशास्त्र विभागाने केलेला आहे. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिगंबर बिरादार यांनी या पथनाट्याला मार्गदर्शन केले.तसेच डॉ. नामदेव पवार,डॉ. गणेश मोरे, प्रा. नम्रता निंबाळकर यांचे सहकार्य लाभले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!