Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Akola Politics : अकोल्यात राजकारण तापले! MIM च्या पाचही नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार, पक्षाकडून नोटीस

Akola Politics : अकोल्यात राजकारण तापले! MIM च्या पाचही नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार, पक्षाकडून नोटीस

Akola Politics : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएमच्या पाचही नगरसेवकांवर पक्षाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत एमआयएमकडून पाचही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भाजप समर्थित गटाला सहकार्य करत स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीत पाठिंबा दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

अकोटमध्ये यापूर्वी भाजप-एमआयएम युतीमुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर युती तुटल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता एमआयएमच्या नगरसेवकांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांना समर्थन दिल्याने अप्रत्यक्ष युतीची चर्चा पुन्हा रंगली आहे. या घटनेमुळे विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असून एमआयएममधील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.

दरम्यान, जितेन बरेठीया याचा भाजपशी संबंध नाही. भाजपला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप आमदार भारसाकळे यांनी केला होता. जितेन बरेठिया यांचे वडील रामचंद्र बरेठिया अजूनही भाजपचे नेते असल्याची माहिती मिळत असून त्याचे पुरावे देखील समोर आले आहेत.

आमदार भारसाकळे यांच्याशी जवळीक संबंध असल्याचे फोटो देखील समोर आलेले आहेत. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवकपदी भाजपच्या नेत्याच्या मुलाची निवड झाल्याने विरोधकांकडून टीका होत आहे.

रेश्मा परवीन मोहम्मद अजीम, युसुफ खान हादीक खान, दिलशाद बी रज्जाक खा, अफरीन अंजुम मो. शरफोद्दिन, हन्नान शाह सुलतान शाह अशी एमआयएमच्या या पाच ५ नगरसेवकांची नावं आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!