Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म भरलेल्या शिल्पा केळुसकर विजयी

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म भरलेल्या शिल्पा केळुसकर विजयी

Shilpa Keluskar: महापालिका निवडणुकीमधील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून पाहिल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक 173 चा निकाल लागला आहे. या ठिकाणी भाजपचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडलेल्या शिल्पा केळुसकरांनी (Shilpa Keluskar) विजय मिळवला आहे. शिल्पा केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा 1722 मतांनी पराभव केला. हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून महायुतीकडून शिंदेंच्या सेनेला जागा सोडण्यात आली होती. या ठिकाणी शिंदेंचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुसकरांनी त्यांना दिलेल्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढला आणि पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. आता त्यांचा विजय झाला आहे.

केळुसकर-कांबळेंमध्ये जोरदार लढत
शिल्पा केळुसकर यांनी पूजा कांबळे यांचा 1722 मतांनी पराभव केला असून तो शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या दरम्यान केळुसकरांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या उमेदवाराला उद्देशून ’50 खोके एकदम ओक्के’ घोषणा देऊन डिवचलं होतं. त्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केळुसकराना ‘एबी फॉर्म चोर’ असं म्हटलं होतं.

प्रभाग क्रमांक 173 मधून भाजपने शिल्पा केळुसकर यांना आधी एबी फॉर्म दिला होता. मात्र ही जागा शिंदेंना गेल्यानंतर त्यांनी तो परत मागवून घेतला. मात्र शिल्पा केळुसकरांनी त्या फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि ती झेरॉक्स लावून फॉर्म भरला.

ही गोष्ट भाजपच्या लक्षात आल्यानंतर मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिल्पा केळुसकरांचा अर्ज ग्राह्य धरू नये अशी विनंती केली होती. तरीही निवडणूक आयोगाने शिल्पा केळुसकर यांचा अर्ज ग्राह्य धरला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!