पुणे : इयत्ता बारावी २०२३-२४ मध्ये पूर्ण केलेले विद्यार्थी आणि २०२५ मध्ये बारावी पूर्ण करणार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एचसीएल टेकने तिच्या ‘टेकबी प्रोग्राम’ची घोषणा केली, ज्यामुळे विद्यार्थांना बारावीनंतर त्यांचे करिअर सुरू करण्याची संधी मिळेल. संपूर्ण भारतामधील विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम खुला आहे.
याबाबत एचसीएल टेकचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रह्मण्यम बालासुब्रह्मण्यम म्हणाले, निवडक विद्यार्थ्यांना एचसीएल टेककडून १२ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना कंपनीसोबत फुलटाइम जॉबची सुविधा दिली जाते आणि बिट्स पिलानी, आयआयआयटी कोट्टायाम, शस्त्र युनिव्हर्सिटी आणि अॅमिटी युनिव्हर्सिटी ऑनलाइन यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून ते त्यांचे पार्टटाइम उच्च शिक्षण् सुद्धा घेऊ शकतात. मॅथेमॅटिक्स किंवा बिझनेस मॅथेमॅटिक्स यामध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी तांत्रिक भूमिकांसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी एचसीएलटेकबी या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.


