Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime : गाडी घासली अन् महिला संतापली, कारसमोर असलेल्या तरुणाला 2 किमी फरफटत नेलं; संगमवाडीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime : गाडी घासली अन् महिला संतापली, कारसमोर असलेल्या तरुणाला 2 किमी फरफटत नेलं; संगमवाडीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime : पुण्यातील कल्याणीनगर-संगमवाडी रस्त्यावर शनिवारी भरदिवसा एका महिला चालकाने क्रूरतेचा कळस गाठला. किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेण्या थरारात झाले असून, एका तरुणाला कारच्या बोनेटवर तब्बल २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

शनिवारी दुपारी १२:३० च्या सुमारास कल्याणीनगरकडून संगमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिला कारचालक आणि इनोव्हा चालक यांच्यात गाडी घासल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, इनोव्हा चालकाने महिलेची गाडी अडवण्यासाठी स्वतःचे वाहन रस्त्यात आडवे लावले. त्यानंतर तो तरुण महिलेच्या कारसमोर येऊन तिला जाण्यापासून रोखू लागला.

संतापलेली महिला आणि २ किमीचा जीवघेणा प्रवास

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोर तरुण उभा असतानाही महिला चालकाने रागाच्या भरात गाडीचा वेग वाढवला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुण थेट कारच्या बोनेटवर चढला. मात्र, माणुसकी विसरलेल्या त्या महिलेने गाडी न थांबवता तशाच अवस्थेत तरुणाला बोनेटवर लटकवून सुमारे २ किलोमीटरपर्यंत गाडी सुसाट पळवली. रस्त्यावरील नागरिक आरडाओरडा करत होते, मात्र महिला गाडी थांबवण्यास तयार नव्हती.

हेही वाचा – डॉक्टरांचा अंदाज ठरला जीवघेणा! पुण्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या तरुणाला दिलं पित्ताचं औषध, घरी गेल्यानंतर 15 मिनिटांतच…

अचानक ब्रेक लावला अन तरुण कोसळला

काही अंतर कापल्यानंतर महिलेने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने बोनेटवर असलेला तरुण रस्त्यावर फेकला गेला. यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. योगायोगाने परिसरात व्हीआयपी (VIP) बंदोबस्तासाठी पोलीस तैनात होते, त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पोलिस कारवाई सुरू

या घटनेमुळे संगमवाडी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांच्या चालकांची चौकशी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. रस्त्यावरील वादातून कोणाचाही जीव धोक्यात घालणे गंभीर गुन्हा असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!