Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भुजबळांना मिळालेली ‘क्लीन चीट’ वादाच्या भोवऱ्यात; अंजली दमानियांचा संताप, फडणवीसांवर डागली तोफ

भुजबळांना मिळालेली ‘क्लीन चीट’ वादाच्या भोवऱ्यात; अंजली दमानियांचा संताप, फडणवीसांवर डागली तोफ

Anjali Damania on Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना ‘एसीबी’ पाठोपाठ आता ‘ईडी’च्या (ED) विशेष न्यायालयानेही दिलासा दिला आहे. मात्र, या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. भुजबळांना मिळालेली ही मुक्ती तात्पुरती असून आपण याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) धाव घेणार असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.

“सरकार भुजबळांच्या पाठीशी”

पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला की, भुजबळांना निर्दोष सोडण्यासाठी आधीचे ठाकरे सरकार आणि आताचे फडणवीस सरकार या दोघांनीही मदत केली आहे. “ईडीकडे सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब असतानाही असा निकाल लागणे दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयात योग्य माहिती मांडली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी भ्रष्टाचाराविरोधात रान पेटवले होते, पण आता तेच भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. भाजपने आधी आरोप करायचे, यंत्रणा मागे लावायच्या आणि मग क्लीन चीट द्यायची, ही नवी पद्धत सुरू केली आहे.”

लढा अजून संपलेला नाही!

भुजबळांविरुद्धचा हा लढा २०१४ पासून सुरू असल्याचे सांगत दमानिया यांनी म्हटलं की, महाराष्ट्र सदन आणि इतर दोन गुन्ह्यांत दिलासा मिळाला असला, तरी ‘कलिना सेंट्रल लायब्ररी’ घोटाळ्याचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे भुजबळांना पूर्णपणे क्लीन चीट मिळालेली नाही. न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी दमानिया मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या संदर्भात देशाचे सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वस्तुस्थिती मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय होता मूळ घोटाळा?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) असा आरोप केला होता की, सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना भुजबळांनी ‘के.एस. चामणकर एंटरप्राइजेस’ला निविदा न काढता कंत्राट दिले. अहवालात खोटी माहिती देऊन विकासकाला प्रत्यक्षात ३६५ टक्के नफा मिळवून दिला, तर कागदोपत्री तो केवळ १.३३ टक्के दाखवला. ईडीने याच व्यवहारातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास केला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!