पुणे : नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जळगाव येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
KBCNMU सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज, जळगाव येथे इनक्युबेशन मॅनेजर (आयएम), ज्युनियर ऑफिसर-अकाउंट्स-कम-प्रशासन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, केबीसीएनएमयू-सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (केसीआयआयएल) स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस नवीन इमारत, केबीसीएनएमयू, उमाविनगर, जळगाव ४२५ ००१ (एम.एस.) येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://nmu.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


