Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sharad Pawar on Ajit Pawar Death: ‘एका कर्तृत्त्ववान व्यक्तीला महाराष्ट्र मुकला’; अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on Ajit Pawar Death: ‘एका कर्तृत्त्ववान व्यक्तीला महाराष्ट्र मुकला’; अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते बारामती तालुक्यात एकूण चार सभा घेणार होते. परंतु बारामतीतील विमानतळावर लँडिंग होत असतानाच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते बारामतीत जमले असून अनेक बड्या नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंबीयदेखील बारामतीत दाखल झाले आहे. पवार यांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे काका म्हणजेच खासदार शरद पवार हेदेखील बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांनी बारामतीतील शासकीय रुग्णालयात जाऊन अजित पवार यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेला हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

कृपया यात राजकारण आणू नका
तसेच एका कर्तृत्त्ववान व्यक्तीला महाराष्ट्राला मुकला. न भरून निघणारं नुकसान आहे. या अपघाताच्या मुळाशी राजकारण आहे, अशी भूमिका कलकत्यावरून मांडली गेली. यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी यात राजकारण आणू नये, अशी विनंती सर्वांना केली आहे.

शरद पवारांनी रनवेवर घेतली माहिती
शरद पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली. रन वेवर असतानाच शरद पवारांनी ही माहिती घेतली. अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर ‘रन वे’ ज्या ठिकाणी संपतो त्याच्या आधी एक किमी अंतरावर विमानाचा अपघात झाला. त्या ठिकाणी असलेल्या बाजूच्या खोलगट भागात हा अपघात झाल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आलं.शरद पवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, अजित पवारांच्या अकाली निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याही अश्रूचा बांध फुटला, ते पाहून सगळेच भावुक झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!