मुंबई : बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यात त्यांच्या चर्चाही रंगत असतात. त्यातच नीलम कोठारी ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण, आता ती सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून आली. तिने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या प्रेमकथेबद्दल आणि लग्नाबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला. बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित रोमँटिक जोडपे, शाहरुख खान आणि गौरी खान यांना एकत्र आणण्यात तिचा हात होता. काही महिन्यांपूर्वी, शाहरुख खानने याबाबत विधान केले होते. या दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नीलम म्हणाली की, जेव्हा मी चित्रपटांमध्ये होते तेव्हा शाहरुख माझा खूप मोठा चाहता होता आणि गौरीही खूप मोठी चाहती होती. ते माझे चित्रपट एकत्र पाहायला यायचे. अशा प्रकारे त्यांचा प्रेमसंबंध सुरू झाला. आम्ही नीलमचे चित्रपट एकत्र पाहायला जायचो. मला हे आधी माहित नव्हते. शाहरुख आणि गौरी एकत्र येण्याचे एक कारण मी आहे.


