Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Plane Crash Controversy : ‘अजित पवारांचा अपघात की घातपात?’; भाजपच्या भ्रष्टाचार फाईलवरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Plane Crash Controversy : ‘अजित पवारांचा अपघात की घातपात?’; भाजपच्या भ्रष्टाचार फाईलवरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Plane Crash Controversy: माजी दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणाला ‘राजकीय कटाचे’ वळण दिले आहे. ‘भाजपच्या घोटाळ्यांची फाईल उघडण्याची भाषा केल्यानंतर अवघ्या १० दिवसांत दादांचा मृत्यू होणे हे केवळ योगायोग असू शकत नाही,’ असे म्हणत राऊत यांनी थेट सत्ताधाऱ्यांकडे संशयाची सुई वळवली आहे.

१० दिवसांचे ते ‘रहस्य’ काय?
संजय राऊत यांनी या घटनेचा क्रम लावताना गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, १५ जानेवारी रोजी अजित पवारांनी भाजपनेते भ्रष्टाचारात अडकल्याची फाईल आपल्याकडे असल्याचे जाहीर केले होते. या विधानानंतर बरोबर १० व्या दिवशी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ही घटना आपल्याला ‘जस्टिस लोया’ प्रकरणाची आठवण करून देते, असे सांगत राऊत यांनी याला ‘गुड’ मृत्यू म्हटले आहे. विमानात सहा प्रवासी असताना केवळ पाचच मृतदेह कसे सापडले? सहावी व्यक्ती कोण होती? आणि जर सर्व मृतदेह जळून खाक झाले होते, तर अजितदादांकडे असलेली ती कागदपत्रे कशी काय सुरक्षित राहिली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ती फाईल बारामतीला सुरक्षित स्थळी नेली जात होती का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवाराचं विराजमान होणार? तटकरे, पटेल यांना पदाधिकाऱ्यांचं पत्र; काय म्हटलंय पत्रात?

‘मराठमोळा पक्ष आता गुजराती व्यापाऱ्यांच्या हाती’
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरही राऊतांनी प्रहार केला. ‘ज्या पक्षाचा चेहरा अस्सल मराठमोळा होता, तो आता शाह, मोदी आणि पटेल यांच्या दावणीला बांधला गेला आहे. भाजपची ही ‘गिळंकृत’ करण्याची वृत्ती महाराष्ट्राची अस्मिता संपवणारी आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

फडणवीसांवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, ‘अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसावा, म्हणूनच कदाचित त्यांनी विलिनीकरणाच्या हालचाली गुप्त ठेवल्या असतील. आज दादा उत्तर द्यायला हयात नाहीत, याचा अर्थ असा नाही की त्यांच्या नावावर काहीही खोटे दावे खपवून घेतले जातील.’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!