Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘अजित पवार अपघातामागे काही षडयंत्र असेल, तर …’, अजित पवार विमान दुर्घटनेवर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

‘अजित पवार अपघातामागे काही षडयंत्र असेल, तर …’, अजित पवार विमान दुर्घटनेवर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Ujjwal Nikam On Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात संशयाचे धुमारे फुटले आहेत. “विमानात सहा प्रवासी असताना पाचच मृतदेह कसे सापडले?” या आमदार अमोल मिटकरींच्या प्रश्नाने खळबळ उडवून दिली असतानाच, आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भाजप खासदार उज्ज्वल निकम यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या वादाला कायदेशीर आधार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

निकम यांच्या मते, विमानात सहा प्रवासी होते हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. तांत्रिक माहितीशिवाय असे दावे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सुचवले. विमानातील इंधनाचे प्रमाण जास्त असल्याने भीषण आग लागली. यामुळे मृतदेह कोळशासारखे जळून खाक झाले, ही एक नैसर्गिक दुर्घटना असू शकते. या घटनेला विनाकारण वेगळी कलाटणी दिली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – Plane Crash Controversy : ‘अजित पवारांचा अपघात की घातपात?’; भाजपच्या भ्रष्टाचार फाईलवरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा

‘कट’ सिद्ध करण्यासाठी पुरावा हवा

‘जर कोणाला हा घातपात वाटत असेल, तर कायद्याच्या भाषेत ‘कटाचा सिद्धांत’ मांडण्यासाठी प्राथमिक पुराव्यांची गरज असते. सध्या तरी तसा कोणताही पुरावा उपलब्ध नाही,’ असे निकम यांनी स्पष्ट केले.

अमोल मिटकरींचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे, आमदार अमोल मिटकरी आपल्या संशयावर ठाम आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत जळजळीत शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘दादा असा निरोप घेऊच शकत नाहीत. ज्यांनी हा घात केला आहे, त्यांच्या वंशाचा दिवा विझल्याशिवाय राहणार नाही,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. मिटकरींच्या या दाव्यामुळे अजितदादांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.

तज्ज्ञांचे मत विरुद्ध राजकीय शंका
एकीकडे उज्ज्वल निकम या घटनेकडे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पाहत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याला राजकीय षडयंत्र मानत आहेत. या दोन भिन्न प्रवाहांमुळे बारामती विमान अपघाताचे गूढ अधिकच वाढत चालले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!