Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Udhampur Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार

Udhampur Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार

Udhampur Encounter: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका थरारक मोहिमेत जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या दोन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बनसंतगडमधील जाफर जंगलात लपलेल्या या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने चक्क त्यांची ‘नैसर्गिक गुहा’च स्फोटाने उडवून दिली.

अशी झाली कारवाईची सुरुवात
मंगळवारी दुपारी रामनगरच्या घनदाट जंगलात भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) यांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. दुपारी ४ च्या सुमारास सुरक्षा दलांना एका नैसर्गिक गुहेत हालचाल जाणवली. भारतीय जवानांनी आव्हान देताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरुवातीच्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला होता, मात्र तरीही त्यांनी गुहेच्या आत आश्रय घेतला.

रात्रभर वेढा आणि ड्रोनची पाळत
संध्याकाळी ७:३० च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी वेढा तोडून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, आधीच सावध असलेल्या जवानांनी त्यांना पुन्हा गुहेत ढकलले. दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लष्कराने पॅराट्रूपर्स, स्निफर डॉग्स आणि अत्याधुनिक थर्मल ड्रोन्स पाचारण केले होते.

निर्णायक हल्ला: गुहाच केली उद्ध्वस्त
बुधवारी सकाळी ‘ऑपरेशन किया’ अंतर्गत लष्कराने अंतिम प्रहार करण्याचे ठरवले. दहशतवादी गुहेच्या खोल भागात लपून सतत गोळीबार करत असल्याने थेट आत शिरणे धोकादायक होते. अखेर लष्कराने रणनीती बदलून गुहेचे प्रवेशद्वारच स्फोटकांनी उडवून दिले. या भीषण स्फोटात गुहेचा भाग कोसळला आणि दोन्ही दहशतवादी जागीच ठार झाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!