Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजितदादांचा अपघात की पूर्वनियोजित घातपात? रोहित पवारांनी ‘मोसाद’चा दाखला देत उपस्थीत केले 10 खळबळजनक प्रश्न

अजितदादांचा अपघात की पूर्वनियोजित घातपात? रोहित पवारांनी ‘मोसाद’चा दाखला देत उपस्थीत केले 10 खळबळजनक प्रश्न

Rohit Pawar On Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राजकीय वर्तुळातून गंभीर आरोप होऊ लागले आहेत. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला ‘घातपाता’चे वळण देत अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. इस्त्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’च्या कार्यपद्धतीचा संदर्भ देत त्यांनी या संपूर्ण घटनेमागे काही अदृश्य हात आहेत का, असा सवाल केला आहे.

१. ऐनवेळी ‘प्लॅन’ का बदलला?
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, अजितदादांचा प्रवास रस्तेमार्गाने होणार होता. मात्र, आदल्या रात्री विदर्भातील एका बड्या नेत्याने फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी दादांना मंत्रालयात गुंतवून ठेवले. तसेच पक्षाच्याच एका मोठ्या नेत्याला भेटण्यासाठी उशीर झाला. हे सर्व दादांना रस्ते प्रवासाऐवजी विमानाने प्रवास करण्यास भाग पाडण्यासाठी केलेले नियोजन होते का? असा संशय त्यांनी व्यक्त केला.

२. विमानाचे पायलट आणि ट्रान्सपाँडरचे रहस्य
विमानाचे दोन्ही वैमानिक ऐनवेळी का बदलण्यात आले? संकटाच्या वेळी पायलटने ‘मेडे’ (कॉल फॉर हेल्प) संदेश का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर (ज्यामुळे विमानाचे लोकेशन कळते) बंद का होता? वैमानिकाला मुद्दाम अपघात घडवायचा होता का? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले.

३. ‘मोसाद’ कनेक्शन आणि संशयास्पद सुरक्षा
रोहित पवारांनी इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेवरील एका पुस्तकाचा दाखला दिला, ज्यात नेत्याला संपवण्यासाठी त्याच्या चालकाला किंवा यंत्रणेला कसे ‘मॅनिपुलेट’ केले जाते, याचे वर्णन आहे. तसेच, दादांनी अलीकडेच प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे बंद करून स्वतःच्या काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली होती. त्यांना काही धोक्याची कुणकुण लागली होती का? असा प्रश्न रोहित यांनी विचारला.

अपघाताच्या वेळी काय घडले? (घटनाक्रम)
सकाळी ७:५०: दादा विमानतळावर पोहोचले.
सकाळी ८:१०: विमानाचे उड्डाण (टेक ऑफ).
सकाळी ८:४५: ला अपघात आणि स्फोट.

दरम्यान, विमान कलले आणि नंतर त्याचा स्फोट झाला. कंपनीचा मालक धुक्याचा दावा करत असला तरी घटनास्थळावरील परिस्थिती वेगळीच असल्याचे रोहित पवारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! आता अजितदादांच्या अपूर्ण राहिलेल्या ‘या’ इच्छा पूर्ण होणार

व्हीएसआर (VSR) कंपनीवर गंभीर आरोप
ज्या कंपनीच्या विमानाने हा अपघात झाला, त्या ‘VSR’ कंपनीच्या कार्यपद्धतीवर रोहित पवारांनी कडाडून टीका केली.

  • सुरक्षितता धाब्यावर: या कंपनीच्या विमानांना युरोपमध्ये बंदी असताना भारतात कशी मुभा आहे?
  • तांत्रिक बिघाड: विमानाची ‘स्टॉल वॉर्निंग सिस्टिम’ आणि ‘EGPWS’ (जमिनीजवळ असल्याचा इशारा देणारी यंत्रणा) बंद होती का?
  • इंधन बचत: कंपनीने पायलटवर इंधन वाचवण्यासाठी दबाव टाकला होता का? जास्तीचे इंधन वाहून नेणे हे ‘विमानातील बॉम्ब’ ठरले का?

रोहित पवारांचे ५ सर्वात रोखठोक सवाल

  • विमानाचे एअरवर्थी रिपोर्ट आणि टेकलॉग आतापर्यंत समोर का आले नाहीत?
  • दोन वर्षांपूर्वी याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता, त्याचा तपास का दाबला गेला?
  • अपघात झाला त्या ठिकाणी दादांचे घड्याळ १५ मिनिटे पुढे का मिळाले?
  • चौकशी केवळ भारतीय एजन्सीकडून न करता अमेरिका किंवा फ्रान्सच्या यंत्रणांकडून का केली जात नाही?
  • कंपनीच्या मालकावर अजूनही मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल झाला नाही?
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!