Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी नव्हे तर उद्योजकतेकडेही वाटचाल करावी; अंकिता पाटील-ठाकरेंचा तरुणांना मोलाचा सल्ला

विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी नव्हे तर उद्योजकतेकडेही वाटचाल करावी; अंकिता पाटील-ठाकरेंचा तरुणांना मोलाचा सल्ला

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथे बुधवार (दि. ११) रोजी फूड फेस्टिव्हल–२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम पार पडला.

हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख उद्‌घाटक म्हणून नूतन पुणे जिल्हा परिषद सदस्या आंकिता ताई पाटील-ठाकरे या उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. विशेषतः मुलींनी उद्योग क्षेत्रातील संधी ओळखून आत्मनिर्भर बनावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. महिला सबलीकरणासाठी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक असून, महाविद्यालयीन स्तरावर कौशल्य विकासावर आधारित उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच येणाऱ्या काळात उद्योजकता विकास कार्यशाळांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ व डॉ. सदाशिव उंबरदंड, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. तानाजी कसबे व डॉ. आत्माराम फलफले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे तसेच विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. तानाजी कसबे यांनी बदलत्या शिक्षणपद्धतीसोबत व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यात नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीचे उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपप्राचार्य दत्तात्रय गोळे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले .

फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यानी 65 फुड स्टॉल लावले होते थालापीठ, बिर्याणी, चिकन रोल्स, पाणीपुरी, भेळ, वडावाप,लस्सी, मसाले दूध, चिरोटे, नूडल्स आदी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. या उपक्रमात सुमारे ६५,००० रुपयांची उलाढाल झाली. महाविद्यालयातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्टॉल्सना भेट देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांच्या पदार्थांचे परीक्षणही करण्यात आले.

या उपक्रमासाठी प्रा. स्वाती राऊत, प्रा. सचिन आरडे, प्रा. अदिनाथ चोरमले,प्रा. सचिन आरडे प्रा. संभाजी ढुके, डॉ. शिवाजी राजगुरू, प्रा.सुरेंद्र शिंदे, प्रा. गौरी कानगुडे आदी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती राऊत व दिव्या जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!