Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

इंदापूर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे होते.

अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, प्रशासनकौशल्य आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख मनोगत प्रा. नामदेव पवार यांनी व्यक्त केले त्यांनी शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान, स्त्री -विषयक दृष्टीकोन तसेच सर्वधर्म समभावविषयक आणि स्वराज्य संकल्पनेचे विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या वतीने पल्लवी देवकर, श्रेया मगर यांनी मनोगते व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष करत शहरातून रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम माने, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. आत्माराम फलफले, पुरुषोत्तम साठे तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम माने यांनी केले तर आभार डॉ. तानाजी कसबे यांनी मानले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!