Today मंगळवार, 30th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ahilyanagar News : संगमनेरमध्ये सहावीच्या मुलीवर अॅसिड हल्ला; चित्रा वाघ यांनी दिला कुटुंबाला शब्द, नेमक्या काय म्हणाल्या?

Ahilyanagar News : संगमनेरमध्ये सहावीच्या मुलीवर अॅसिड हल्ला; चित्रा वाघ यांनी दिला कुटुंबाला शब्द, नेमक्या काय म्हणाल्या?

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने अॅसिड फेकल्याची घटना मंगळवारी घडली. शाळेतून घरी परतत असताना हा भयंकर हल्ला करण्यात आला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गंभीर इजा झाली असून तिच्यावर लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ वडगावपान गावातील नागरिकांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधून शासनाकडून सर्वोत्तम वैद्यकीय मदत दिली जाईल, असा विश्वास दिला. तसेच कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचा शब्दही त्यांनी दिला आहे.

राज्य सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री विखे पाटील स्वतः लक्ष ठेवून आहेत. आरोपीला लवकरच अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका शासनाने घेतली आहे. महिलां आणि बालकांच्या सुरक्षेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण कायम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!