पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत चार रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही ९ एप्रिल २०२६ रोजी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई येथे घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक/S&T, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/S&T, प्रकल्प अभियंता/S&T.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०९ एप्रिल २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्थानकाजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.konkanrailway.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


