Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

रायगड: जिल्ह्याच्या पेणमधील (Raigad) भोगावती नदीत (River) बुडून एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना घडली. वसीम अन्सारी असं या युवकाचं नाव असून हॉलिबॉल खेळताना हा अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अन्सारी कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं आहे. दरम्यान, हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्कू टीमच्या मदतीने वसीमचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरात एक दुःखद घटना घडली असून वसिम शेख अन्सारी (राहणार सागर सोसायटी पेण) असं या तरुणाचे नाव असून मित्रांसोबत भोगावती नदीकिनारी पिंपळडोह येथे हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेला. म्हणून, पाण्यातील बॉल काढण्यासाठी तो गेला असता त्याला दम लागला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर माहिती पेण पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पेण येथील अतिदक्षता विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. परंतु, अनेक तास उलटून गेले तरी त्याचा तपास लागत नव्हता. त्यानंतर पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्कू टीमला पाचारण केले. त्यानंतर रेस्क्यू टीमने शोध कार्य सुरू केल्यानंतर साडेतीन तासांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, नदीच्या डोहातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून वसीमच्या मित्रांनाही शोक अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!