Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Coolie No 1 मुळे कोट्यवधींचे नुकसान; वासू भगनानी यांनी डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्यावर केली टीका

Coolie No 1 मुळे कोट्यवधींचे नुकसान; वासू भगनानी यांनी डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्यावर केली टीका

मुंबई : निर्माता वासू भगनानी सध्या त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि त्यांचा मुलगा वरुण धवन यांना टार्गेट केले आहे. त्यांचा दावा आहे की, ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाची कथा त्यांच्या ‘बीवी नं. १’ या चित्रपटाशी खूप साम्य आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत वासू भगनानी यांनी अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, वरुण धवनच्या आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाची कथा त्यांच्या ‘बीवी नं. १’ या चित्रपटाशी खूप मिळतीजुळती आहे. याव्यतिरिक्त, वासू भगनानी यांनी वरुण धवनच्या आगामी चित्रपटात ‘चुनरी चुनरी’ या गाण्याच्या वापराबाबत नाराजी व्यक्त केली. रमेश तौरानी आणि टिप्स त्यांच्या परवानगीशिवाय हे गाणे वापरू शकत नाहीत.

वासू भगनानी म्हणाले की, “चुनरी चुनरी” या गाण्याच्या पुनर्वापरामुळे त्यांना खूप दुःख झाले आहे. संगीत लेबलशी संबंधित लोक या विषयावर त्यांना भेटायलाही तयार नाहीत.

कुली नं. 1 मुळे वासू यांना कोट्यवधींचे नुकसान

डेव्हिड धवनच्या कुली नं. 1 या चित्रपटावर झालेल्या नुकसानीबद्दलही वासू भगनानी यांनी उघडपणे भाष्य केले. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे त्यांना अंदाजे २७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. मी डेव्हिडजींना सांगितले होते की, मला ‘बीवी नं. १’ बनवायचा आहे. पण ‘कुली नं. १’ मध्ये मला प्रचंड नुकसान झाले. मी फक्त नावापुरता निर्माता होतो, कारण संपूर्ण निर्मिती आणि खर्च डेव्हिडजीच सांभाळत होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!