Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bihar Nalanda Stampede: नालंदा हादरले! शीतला माता मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू

Bihar Nalanda Stampede: नालंदा हादरले! शीतला माता मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू

Bihar Nalanda Stampede: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील दीप नगर भागात असलेल्या प्रसिद्ध शीतला माता मंदिरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या अलोट गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नियोजनशून्य कारभारामुळे ओढवला प्रसंग
चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शीतला माता मंदिरात जत्रा आणि पूजेसाठी हजारो भाविक जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साधी रांगेची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. दर्शन लवकर घेण्याच्या घाईत भाविकांमध्ये रेटारेटी सुरू झाली आणि एकमेकांना धक्के देण्याच्या नादात लोक एकमेकांच्या अंगावर पडले. अवघ्या काही क्षणांत या गोंधळाचे रूपांतर भीषण चेंगराचेंगरीत झाले. पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पीडित कुटुंबांना ६ लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून २ लाख रुपये आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ४ लाख रुपये, अशी एकूण ६ लाख रुपये प्रति व्यक्ती आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमींवर मोफत आणि दर्जेदार उपचार करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पोलीस बंदोबस्तात त्रुटी?
या दुर्घटनेसाठी स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना जबाबदार धरले जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज एका दीक्षांत समारंभासाठी नालंदा दौऱ्यावर असल्याने जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा तिथे तैनात होता. पोलिसांचे संपूर्ण लक्ष राष्ट्रपतींच्या सुरक्षेकडे वळल्यामुळे मंदिरातील जत्रेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जर वेळेत पुरेसा बंदोबस्त असता, तर ही जीवितहानी टाळता आली असती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!