Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गॅस टंचाईमुळे राज्य सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सिलिंडरची कमतरता संपून जाणार!

गॅस टंचाईमुळे राज्य सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सिलिंडरची कमतरता संपून जाणार!

LPG And PNG Gas Connection: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग उर्जासंकटाच्या उंबरठ्यावर आहे. भारतात तर गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर तो वेळेवर मिळतही नाही. दुसरीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जावणत आहे. अनेक ठिकाणी लोक आपले वाहन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. लोक रिकामे गॅस सिलिंडर घेऊन डिस्ट्रीब्युjepd/elक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. आता राज्य सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू नये यासाठी पीएनजीच्या कनेक्शनबाबत मोठा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे लोकांची गॅस टंचाईची समस्या संपण्यास मदत होणार आहे.

रस्ते पूर्ववत करण्याचे शुल्क माफ करण्यात आले
जागतिक घडामोडींमुळे एलपीजी (LPG) पुरवठ्यावर मर्यादा आल्याने महाराष्ट्र सरकारने ‘सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन’ (CGD) नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पाइपलाईनसाठीच्या प्रलंबित परवानग्या आता ‘मंजूर’ समजल्या जातील आणि नवीन अर्जांना २४ तासांत मंजुरी दिली जाईल. कामाला गती देण्यासाठी रस्ते पूर्ववत करण्याचे शुल्क माफ करण्यात आले असून कंपन्यांना २४ तास काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आता पीएनजी गॅस अत्यावश्यक सेवा
तसेच, आता अग्निशमन दल किंवा वाहतूक पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची (NOC) गरज भासणार नाही. सर्व अटी, शर्ती शिथील करण्यात आल्या आहेत. आतापासून PNG (piped natural gas) ला पाणी, वीज प्रमाणे अत्यावश्यक सेवा मानली जाईल. हॉटेल, शाळा, हॉस्पटिल्स, कम्युनिटी किचन, वसतिगृह यांना कमर्शियल दराने 50 टक्के सप्लाय केले जाईल. मात्र डोमेस्टिक वापरला प्राधान्य असेल, असे सरकारने सांगितले आहे. या या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नागरी पुरवठा संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, कुठेही इंधन टंचाई नाही. युद्धामुळे लोकांमध्ये अस्थिरता वाढलेली आहे. त्यामुळे लोक घाईत गॅस बुकिंग करत आहेत, असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!