Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalna Accident: जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 6 मजूर महिलांना ट्रकने चिरडलं

Jalna Accident: जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 6 मजूर महिलांना ट्रकने चिरडलं

Jalna Samruddhi Highway Accident : वाहतुकीच्या नियमांचे पालन करूनच नेहमी प्रवास करावा, वाहन चालवावे असा सल्ला दिला जातो. महामार्गांवर प्रवास करताना नियमांचे उल्लंघन केल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक भीषण अपघात समोर आलेले आहेत. आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात एक मोठा आणि दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे हेलावून टाकणारे काही फोटो समोर आले असून मृतांबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसा जालन्यात समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली आहे. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने एक ट्रक निगाले होते. हा ट्रक भरधाव वेगात समृद्धी महामार्गावरून जात होता. याच भागात मजूर महिला काम करत होत्या. कामात गुंतलेल्या असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या मजूर महिलांना थेट उडवलं आहे. या अपघातात पाच ते सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत महिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी
या भीषण अपघाताबाबत समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पालिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. मृत मजूर महिलांची ओळख पटवली जात आहे. अपघातानंतर काही काळासाठी समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत परिस्थिती पूर्वपदावर आणला. या घटनेची आता सखोल चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे मृत्युमुखी पडलेल्या मजूर महिलांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार काही मदत करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर याआधीही अनेक मोठे अपघात झालेले आहेत. समृद्धी महामार्गावर कुठेही गतीरोधक नाही. तसेच हा सरळमार्गी रस्ता असल्याने वाहनांची गती खूप असते. त्यामुळेच एखादी जरी चूक झाली तरी मोठा आणि भीषण अपघात होतो.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!