Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लवकरच सोलापुर-अजमेर रेल्वेगाडीस जेऊर येथे थांबा मिळणार; आमदार नारायण पाटील यांच्या मागणीला यश

लवकरच सोलापुर-अजमेर रेल्वेगाडीस जेऊर येथे थांबा मिळणार; आमदार नारायण पाटील यांच्या मागणीला यश

करमाळा(पुणे) : जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल सोलापूर मंडलने पुढील कार्यवाहीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला आहे. यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी सोलापूर-अजमेर एक्स्प्रेस गाडीला जेऊर रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, या मागणीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेत सोलापूर विभागाने सकारत्मक प्रतिसाद दिला आहे.

याबाबतची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी आमदार नारायण पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळवली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमदार पाटील यांच्या मागणीनुसार जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर-सोलापुर-अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का? याची सखोल पडताळणी केली. अहवालानुसार, पाटील यांनी केलेली मागणी व्यवहार्य असल्याचे दिसुन आले आहे. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी हा अहवाल मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवल्याचे योगेश पाटील सांगितले. यामुळे जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-अजमेर एक्स्प्रेसला थांबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!