Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पती-पत्नीच्या कलहामुळे उकरावा लागला चिमुकलीचा मृतदेह

पती-पत्नीच्या कलहामुळे उकरावा लागला चिमुकलीचा मृतदेह

नाशिक : म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यातील कौटुंबिक कलहातून चिमुकलीच्या मृतदेहाचे हाल झाले. पत्नी माहेरी निघून गेल्याने वडिलांसोबत राहणारी दीड वर्षीय बालिका खेळता खेळता विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची वाच्यता न करता वडिलांनी म्हसरूळच्या स्मशानभूमीत मुलीचा दफनविधी केला. दोन दिवसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पतीनेच घातपात केल्याचा संशय आईने व्यक्त केला. पोलिसांनी मुलीचा दफन केलेला मृतदेह उकरून काढला. शवविच्छेदनाअंती या पाण्यात बुडून झाल्याचे मुलीचा मृत्यू स्पष्ट झाले.

वैष्णवी विकास वळवी असे मृत बालिकेचे नाव आहे. विद्या व विकास यांचा विवाह २०२१ मध्ये झाला. त्यांच्यातील कौटुंबिक वाद गंगापूर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर हे दोघे विभक्त राहू लागले. दीड वर्षीय वैष्णवीचा सांभाळ विकास करीत होता. दोन दिवसांपूर्वी घराजवळ खेळत असताना वैष्णवीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विकासने तिला विहिरीतून बाहेर काढले. याबाबत कोणास काहीही न कळवता त्याने वैष्णवीचा दफनविधी उरकवून टाकला.

या प्रकाराची माहिती वैष्णवीची आई विद्या यांना कळाली. त्यांनी थेट डायल ११२ ला फोन करून यासंदर्भात माहिती देत विकासवर संशय व्यक्त केला. पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व नातलग स्मशानभूमीत पोहोचले. वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. तिचे शवविच्छेदन केले असता, तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत म्हसरूळ पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सखोल तपास केला जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!