Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय; कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय जारी

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय; कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय जारी

मुंबई: पानिपतच्या ‘काला अंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. याबाबत कार्यवाहीसाठी शासन निर्णय आज (दि. १३) जारी करण्यात आला आहे.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, पानिपतच्या तिसऱ्या लढाईला 354 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 14 जानेवारी, 2025 रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत आश्वासन दिले होते. मराठा साम्राज्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध भागात आपले साम्राज्य निर्माण केले होते. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी स्थळे अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘काला अंब’ स्मारकाच्या विस्तारासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा शौर्याचे प्रतीक असणारे भव्य संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि इतर आवश्यक सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता येणार नसल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

या प्रकल्पाकरिता हरियाणा राज्य सरकारशी समन्वय साधण्यासाठी राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल हे समन्वयक, तर जमीन अधिग्रहनाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत केले जाणार असून पर्यटन विभाग ‘नोडल’ म्हणून काम करणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञांची समितीही गठित करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीमुळे मराठा शौर्याचा वारसा जतन होईल आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या महान इतिहासाची माहिती मिळेल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!