मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची भाची झैन मारी खान हिचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येत असल्याचे म्हटले जात आहे. झैन तिच्या पतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ती आता तिचा पती आकाश मोहिमसोबत राहत नाही. मात्र, यावर स्वत: झैनने विधान केले आहे.
आकाश आणि झैन यांनी २०२१ मध्ये लग्न केले होते. आता त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर तिने भाष्य केले. झैनला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलणे योग्य वाटले नाही. जेव्हा अभिनेत्रीला वैवाहिक मतभेदांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने भाष्य करण्यास नकार दिला. तुम्ही जे विचारत आहात ती एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. ही एक अशी वैयक्तिक परिस्थिती आहे, ज्याबद्दल तुमच्याकडे कोणतीही माहिती नाही. त्यामुळे, मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही या अशा बातम्या थांबवा. तुम्ही ट्रान्स बिलाबद्दल बोललात तर मला आनंद होईल, जे मंजूर होणे अनेक लोकांसाठी भयावह आहे.
झैन ही चित्रपट निर्माते मन्सूर खान यांची मुलगी आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक नाट्य कलाकार म्हणून केली. झैन अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिने ‘मिसेस सीरियल किलर’, ‘मोनिका’ आणि ‘ओह माय डार्लिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘मेड इन हेवन २’, ‘इलिगल: जस्टिस’ आणि ‘आउट ऑफ ऑर्डर’ या मालिकांमध्येही दिसली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त, झैन आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत, विशेषतः तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.


