Today बुधवार, 26th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

7-8 तासांची झोप असते गरजेची; जर ती नसेल तर आरोग्यावर होतात ‘हे’ दुष्परिणाम…

7-8 तासांची झोप असते गरजेची; जर ती नसेल तर आरोग्यावर होतात ‘हे’ दुष्परिणाम…

आपण निरोगी राहावं यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेतो. त्यात पोटासाठी अन्न जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षाही डोळ्यांसाठी झोप अधिक महत्त्वाची असते. मात्र, आजच्या जगात लोक अशा एका महत्त्वाच्या गरजेकडे दुर्लक्ष करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

उशिरा झोपणे आणि फक्त ५-६ तास झोप घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण, झोपेच्या वेळी, आपला मेंदू दिवसातील टाकाऊ गोष्टी साफ करतो आणि स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया व भावनांना पुन्हा ताजेतवाने करतो, तसेच शरीरातील भूक, चयापचय आणि तणावाशी संबंधित हार्मोन्सचे नियमन करतो. मात्र, जेव्हा झोप अपुरी असते, तेव्हा शरीराचा समतोल बिघडू लागतो, ज्यामुळे दिवसा थकवा, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि विचार करण्याची गती मंदावते. झोपेच्या कमतरतेचा परिणाम हृदय, रक्तदाब आणि रोगप्रतिकारशक्तीवरही होतो. दीर्घकाळ झोप न मिळाल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेला तणाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

मानवी शरीर घड्याळाप्रमाणे काम करते आणि झोपेची वेळ झाल्यावर संकेत देते. शरीराचा समतोल राखण्यासाठी आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी ७-८ तासांची झोप महत्त्वाची भूमिका बजावते. पण, जेव्हा झोप अपुरी असते, तेव्हा मेंदूला थकवा जाणवतो, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते. यामुळे मनःस्थितीत बदल आणि डोकेदुखी होऊ शकते. याचा शरीराच्या तणाव आणि हार्मोन्स हाताळण्याच्या क्षमतेवरही थेट परिणाम होतो. त्यामुळे नियमित झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!