Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Israel Attack Iran: युद्धविरामापूर्वीच इस्रायलकडून इराणवर पुन्हा भीषण हल्ले; मध्यपूर्वेत तणाव वाढला

Israel Attack Iran: युद्धविरामापूर्वीच इस्रायलकडून इराणवर पुन्हा भीषण हल्ले; मध्यपूर्वेत तणाव वाढला

Israel Attack Iran:  इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे (War) मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला होता, मात्र आता दोन्ही देशांचे नेते शांतता चर्चा करण्यावर सहमत झाले आहेत. लवकरच दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. मात्र दुसरीकडे इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला असून लेबनॉनवर भीषण हल्ल्यांना सुरुवात केली आहे. इस्रायलने हिज्बुल्लासोबत युद्धविराम (सीजफायर) नाकारला आहे.

इस्रायलने स्पष्टपणे सांगितले आहे की, पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये लेबनानच्या अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेत हा मुद्दा घेतला जाणार नाही आणि हल्ले सुरूच राहतील. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनानमधील अनेक भागांवर आज पुन्हा हल्ले केले आहेत. इस्रायल-लेबनान सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले होत आहेत.

हे हल्ले सुरु असताना मार्काबा-बानी हय्यान भागात मोठा स्फोट झाला, तर शेबा गावाच्या बाहेरील भागात एका घरावरही भीषण हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर बिंत जुबैल आणि शकरा या गावांवरही हवाई हल्ले करण्यात आले. जफ्ता शहरातील इमारतींवर ही हल्ले झाले आहेत. यामुळे देशातील अनेकत भागात जाळ अन् धूर दिसून येत आहे. यात इस्रायल कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही हे स्पष्ट होत आहे.

काही दिसवांपूर्वी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती. मात्र त्यानंतर काही तासांतच बेरूतमधील गजबजलेल्या व्यापारी आणि निवासी भागांवर इस्रायलने अचानक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 200 च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. हा इस्रायल-हिज्बुल्ला संघर्षातील सर्वात वाईट दिवस होता.

या युद्धावर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, लेबनान हा या युद्धविराम कराराचा भाग नाही, कारण तिथे इराण समर्थित हिज्बुल्ला सक्रिय आहे. दरम्यान, इराणचे असे म्हणणे आहे की, युद्धविराम लेबनानलाही लागू व्हायला हवा. त्यामुळे आता करारात नेमकं काय ठरतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की, 10 मिनिटांच्या आत बेरूत, दक्षिण लेबनान आणि बेका खोऱ्यात हिज्बुल्लाच्या 100 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले. दरम्यान या हल्ल्यांमुळे इराणने पुन्हा होर्मुज सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे तणाव वाढला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!