Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manoj Jarange Patil: जोपर्यंत सगळे गुन्हे मागे घेणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही, सर्वात मोठं आंदोलन उभारु, जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil: जोपर्यंत सगळे गुन्हे मागे घेणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही, सर्वात मोठं आंदोलन उभारु, जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil: सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशा शब्द सरकारने दिला होता. जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारने तसा शब्द दिलेला आहे. नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करुन सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दाखल गुन्ह्या पैकी 60 ते 62 गुन्हे न्याय प्रविष्ट आहेत. त्याबाबद सरकारने अहवाल देऊन हे गुन्ह मागे घ्यायला हवेत. 80 गुन्हे असे आहेत त्याबाबत विभागीय समितीने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायल हवेत असे जरांगे म्हणाले.

सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही. कसे गुन्हे मागे घेत नाही मी बघतो, मी खंबीर आहे असे जरांगे म्हणाले. गुन्हे मागे घेण्याबाबद विभागीय समितीचा आव्हाल आजून सरकारला गेलेला नाही तो अहवाल गेला की सगळे गुन्हे सरकार मागे घेईल. असे ते म्हणाले.

मराठा समाजाला उप समितीच्या अध्यक्षकडून अपमानास्पद वागणूक चालू, जरांगेंचा विखे पाटलांना टोला
जी उप समिती मराठ्यांची स्थापन झालीय त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, त्यांनी दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. मराठा समाजाला उप समितीच्या अध्यक्षकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती थांबली पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांना समज पाहिजे की मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.
मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उप समिती नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उप समिती नाही, तुमचा माज जिरवायला ही समिती नाही, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

तुमची मस्ती मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुंज लावायची. यासाठी उप समिती नसते. Ecbc च्या विद्यार्थ्यांचं काय? सारथीच्या विद्यार्थ्यांचं काय? आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचं काय? यासाठी उप समिती असते असे जरांगे म्हणाले. आम्हला वाटलं होतं 100 टक्के मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. मात्र उप समितीच्या अध्यक्षांनी उलट उफनायला सुरुवात केली आहे. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ त्यांनी सुरू केली आहे. त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत असे म्हणत जरांगेंनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाहीत? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. बंद किती पडल्या आहेत? बंद पडल्यात हे बघायचे काम उपसमितीच्या अध्यक्षाचे असताना ते मराठे मराठ्यांच्या अंगावर घालायचं काम करत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!