Today रविवार, 20th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather : महाराष्ट्र भट्टीसारखा तापतोय; ‘या’ 5 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

Maharashtra Weather : महाराष्ट्र भट्टीसारखा तापतोय; ‘या’ 5 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग च्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून अनेक भागांत तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केला आहे. विदर्भात तर उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढला असून अकोला 43.1 अंशांसह जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले. नागपूरमध्ये 41.4 अंश, अमरावती 42.4 अंश, वर्धा 42 अंश, वाशीम 41.6 अंश आणि चंद्रपूर 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

आठवडाभरात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दुपारी 11 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशाराही दिला आहे. सध्या राज्यात कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने उकाडा वाढला आहे. मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. जळगाव, मालेगाव आणि सोलापूरमध्येही पारा 41 अंशांच्या पुढे गेला आहे.

दरम्यान, जळगाव, मालेगावसह पाच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15-16 एप्रिलदरम्यान उत्तर भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होणार असले तरी त्याचा महाराष्ट्रावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. त्यामुळे राज्यात आकाश निरभ्र राहून सूर्याची किरणे थेट पडणार आणि उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!