Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पारदर्शक फोन कव्हर वापरल्यानंतर पिवळा का पडतो? आता येईल स्वच्छ करता…

पारदर्शक फोन कव्हर वापरल्यानंतर पिवळा का पडतो? आता येईल स्वच्छ करता…

अनेकदा नवीन फोन घेतल्यानंतर तो सुरक्षित राहावा म्हणून सर्वात आधी स्क्रीन प्रोटेक्टर आणि कव्हर वापरला जातो. त्यात बरेच लोक त्यांच्या फोनचे डिझाईन कायम ठेवत त्याचे संरक्षण करण्यासाठी पारदर्शक कव्हर्स वापरतात. यामुळे फोनच्या डिझाईनला कोणताही धोका पोहोचत नाही, परंतु काही काळ वापरल्यानंतर ते पिवळे पडू लागतात. यामुळे फोन जुना दिसू लागतो आणि तो वापरण्यास कंटाळवाणा वाटू लागतो. मात्र, हा कव्हर स्वच्छ करता येऊ शकतो.

तुम्ही तुमच्या फोनवर कोणत्याही प्रकारचे कव्हर वापरत असलात तरी, ते नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी, फोनवरून कव्हर काढून काही वेळ पाण्यात ठेवा. आता, पाण्यात थोडे साबण घालून कव्हर हळुवारपणे घासून स्वच्छ करा. कव्हरवर कोणतेही हट्टी डाग असल्यास, ते स्वच्छ करण्यासाठी ब्रशवर बेकिंग सोडा वापरा. ​​स्वच्छ केल्यानंतर, फोन एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि पूर्णपणे कोरडा करा. पारदर्शक कव्हरला पिवळे पडण्यापासून रोखणे कठीण आहे, परंतु नियमित स्वच्छतेमुळे त्याचे लाईफ वाढू शकते.

जर फोन कव्हर खूप खराब झाले असेल आणि पूर्णपणे पिवळे दिसू लागले असेल, तर ते स्वच्छ करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर केला जाऊ शकतो. हे रसायन थेट कव्हरवर लावू नये याची काळजी घ्या, कारण असे केल्याने ते खराब होऊ शकते.

अशी घेता येईल त्याची काळजी…

बहुतेक पारदर्शक फोन कव्हर्स थर्मोप्लास्टिक पॉलीयुरेथेन (TPU) पासून बनवलेले असतात. हे प्लास्टिक लवचिक असते आणि फोन खाली पडल्यास बसणारा धक्का सहन करू शकते. हे उत्पादकांसाठी स्वस्त देखील आहे, परंतु याचा एक तोटा आहे. कालांतराने त्याचे ऑक्सिडेशन होऊ लागते. जेव्हा ते अतिनील किरणे (UV light), उष्णता, ऑक्सिजन आणि त्वचेतील तेलाच्या संपर्कात येते, तेव्हा त्याच्या पॉलिमर साखळ्यांमध्ये प्रतिक्रिया होते. या प्रतिक्रियेमुळे कालांतराने कव्हर पिवळे किंवा तपकिरी दिसू लागते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!