Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sahar Shaikh : कैसा हराया…सहर शेख अडचणीत? बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे पद धोक्यात

Sahar Shaikh : कैसा हराया…सहर शेख अडचणीत? बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे पद धोक्यात

Sahar Shaikh : ठाणे महापालिकेतील मुंब्रा प्रभागातून निवडून आलेल्या सहर शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवताना शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

AIMIM च्या नगरसेविका असलेल्या सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. मात्र हे प्रमाणपत्र मिळवताना अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याची तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सहर शेख यांच्या वडिलांनी स्थलांतरितांसाठी लागू असलेल्या नमुन्याऐवजी वेगळा नमुना वापरून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर सहर शेख यांनी त्या प्रमाणपत्रावर ठाणे महापालिका निवडणूक लढवून विजय मिळवला.

या प्रकरणी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून सुनावण्या घेण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान जात प्रमाणपत्रातील काही त्रुटीही निदर्शनास आल्या असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

जानेवारी 2026 मधील निवडणुकीत सहर शेख यांनी मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून विजय मिळवत राजकारणात दमदार एन्ट्री केली होती. मात्र आता या वादामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!