पुणे : नागपूर युनिव्हर्सिटी बिझनेस इनक्युबेशन सेंटर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 30 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. RTM नागपूर युनिव्हर्सिटी बिझनेस इनक्युबेशन सेंटर, नागपूर येथे व्यवस्थापक (नवोन्मेष), तांत्रिक प्रमुख यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : व्यवस्थापक (नवोन्मेष), तांत्रिक प्रमुख.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन किंवा ऑनलाइन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2026.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : INCUBEIN कार्यालय.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nagpuruniversity.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


