मुंबई : अभिनेत्री रूपाली गांगुलीची ‘अनुपमा’ सीरिअल चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. ही मालिकेत आता लवकरच एक नाट्यमय वळण येणार आहे. आतापर्यंत शोमध्ये दाखवण्यात आले आहे की, सावीचे कॅफे बंद आहे. दरम्यान, दिग्विजयला अनुपमाचा नवरा अनुज आहे. हे कळल्यावर दिग्विजय खूप भावूक होतो, असेच सध्या दिसून येत आहे.
अनुपमा आता पुन्हा एकदा अहमदाबादला परतणार आहे, पण यावेळी दिग्विजय, बांकू आणि जया तिच्यासोबत असतील. ताज्या प्रोमोमध्ये अनुपमा अहमदाबादमध्ये पोहोचून भगवान कृष्णाला प्रार्थना करताना दिसते, जर तुम्ही मला इथे परत आणले असेल, तर यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. अनुपमाच्या आयुष्यात एक जुना शत्रू येतो. दुसरीकडे, अहमदाबादमध्ये उत्सवाचे वातावरण आहे आणि बांकू अनुपमाला विचारतो की, आज काही विशेष दिवस आहे का. अनुपमा उत्तर देते, हो, हो. आज सीता नवमी आहे. अनुपमा उत्सवाच्या वातावरणाचा आनंद घेते.
दरम्यान, अनुपमाच्या फोनमध्येही तिचा आणि राहीचा फोटो आहे. अनुपमाचा हात श्रुतीच्या हाताला लागतो आणि तिला जाणवते की काहीतरी गडबड होणार आहे. आपला हात कोणाला लागला हे पाहण्यासाठी अनुपमा मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिचा फोन खाली पडतो.


